News Flash

Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाची हाराकिरी; पिछाडी भरुन काढत गुजरातची सामन्यात बाजी

गुजरात 39-35 ने विजयी

मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यातील एक क्षण

झप्रो-कबड्डीच्या इतिहासात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पराभूत करण्याचं यू मुम्बाचं स्वप्न आजही धुळीला मिळालं. पहिल्या सत्रात घेतलेली आघाडी, यू मुम्बाच्या खेळाडूंनी हाराकिरी करत सामना गुजरातला बहाल केला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने अटीतटीच्या सामन्यात 39-35 ने बाजी मारली. गुजरातचा यू मुम्बावरचा हा पाचवा विजय ठरला आहे.

पहिल्या सत्रात यू मुम्बाच्या खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत गुजरातला चांगलाच धक्का दिला. चढाईमध्ये सिद्धार्थ देसाई आणि रोहित बालियान यांनी आक्रमक खेळ करत मूम्बाला आघाडी मिळवून दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे यू मुम्बाच्या बचावपटूंनी त्यांना चांगली साथ दिली. मात्र पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात गुजरातने सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. के. प्रपंजनने चढाईत काही गुणांची कमाई करत गुजरातचं आव्हान जिवंत ठेवलं. मात्र यू मुम्बाने पहिल्या सत्राअखेरीस 21-16 अशी आघाडी कायम ठेवली होती.

दुसऱ्या सत्रात सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. प्रपंजन आणि सचिन तवंर या खेळाडूंनी यू मुम्बाच्या बचावफळीला चुका करणं भाग पाडलं. मोक्याच्या क्षणी महत्वाच्या खेळाडूंना बाहेर करत गुजरातने हळूहळू सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. याचसोबत दुसऱ्या सत्रात सिद्धार्थ देसाईला बाद करण्यात गुजरातच्या खेळाडूंना यश मिळालं. परवेश भैंसवालने सामन्यात काही चांगल्या पकडी केल्या. दुसऱ्या सत्रात यू मुम्बाला दोनदा सर्वबाद करत गुजरातने सामन्यात आघाडी घेत 39-35 च्या फरकाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2018 10:46 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 silly mistakes cost u mumba game against gujrat fortunegiants
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : पाटणा पायरेट्सची तामिळ थलायवाजवर मात
2 Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीने रोखला गुजरातचा विजयरथ
3 प्रो कबड्डी लीग : तमिळ थलायवाची तेलुगू टायटन्सवर मात
Just Now!
X