06 July 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानात उत्तर प्रदेशची पराभवाने सुरुवात, तामिळ थलायवाज विजयी

46-24 ने केली मात

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाच्या खराब कामगिरीचं सत्र सहाव्या हंगामात कायम राहिलेलं आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या उत्तर प्रदेश योद्धा संघाला तामिळ थलायवाजने पराभवाचं पाणी पाजलं आहे. 46-24 अशा मोठ्या फरकाने मात करत तामिळ थलायवाजने यजमान संघाला पराभवाचा धक्का दिला आहे.

सामन्याच्या पहिल्या सत्रापासून तामिळ थलायवाज संघाने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. सुकेश हेगडे, अजय ठाकूर यांनी आज धडाकेबाज चढायांचं सत्र सुरु करत उत्तर प्रदेशच्या बचावफळीला उघडं पाडलं. दोन्ही खेळाडूंनी सामन्यात प्रत्येकी 9-9 गुणांची कमाई केली. बचावफळीत मनजीत छिल्लर आणि अमित हुडा यांनीही दोन्ही खेळाडूंना चांगली साथ देत आपल्या संघाची आघाडी कायम राखली. या आक्रमक खेळाच्या जोरावर तामिळ थलायवाजने 26-11 अशी मोठी आघाडी घेतली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : वैय्यक्तिक विक्रमापेक्षा संघाचं यश अधिक महत्वाचं – नितीन तोमर

दुसऱ्या सत्रात उत्तर प्रदेशचे खेळाडू पुनरागमन करतील अशी आशा होती, मात्र ती फोल ठरली. प्रशांत कुमार रायचा अपवाद वगळता उत्तर प्रदेशचा एकही खेळाडू आपली छाप पाडू शकला नाही. श्रीकांत जाधवनेही आज निराशा केली, तर भरवशाच्या रिशांक देवाडीगाला एकही गुण कमावता आला नाही. बचावफळीतल्या खेळाडूंनी सामन्याच्या दुसऱ्या सत्रात काही गुण कमावले मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2018 9:15 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 tamil thalaivas beat up yoddhas in their first home ground match
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : वैय्यक्तिक विक्रमापेक्षा संघाचं यश अधिक महत्वाचं – नितीन तोमर
2 ….म्हणून सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीची प्रेक्षकसंख्या घटली
3 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा विजयाने शेवट, बंगाल वॉरियर्सवर मात
Just Now!
X