12 July 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या विजयात सिद्धार्थ देसाई चमकला, बंगालवर केली मात

यू मुम्बा अ गटात अव्वल

बंगालच्या मणिंदर सिंहची पकड करताना यू मुम्बाचे बचावपटू

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात, बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चीत केल्यानंतर यू मुम्बा संघाने आपला विजयी धडाका सुरु ठेवला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात यू मुम्बाने बंगाल वॉरियर्सवर ३१-२० ने मात करत पुन्हा एकदा अव्वल स्थान राखलं आहे. यू मुम्बाच्या संघाने आज अष्टपैलू खेळ केला, चढाईमध्ये सिद्धार्थ देसाईने सर्वाधिक ७ गुणांची कमाई केली. त्याला रोहित बलियान आणि दर्शन कादीयान या खेळाडूंनी चांगली साथ दिली. बंगालच्या बचावफळीला खिंडार पाडण्याचं मोठं काम या चढाईपटूंनी केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे, यू मुम्बाच्या बचावपटूंनीही आज तितकीच महत्वाची कामगिरी बजावली. सुरेंदर सिंह, कर्णधार फजल अत्राचली यांनी प्रत्येकी ४-४ तर धर्मराज चेरलाथनने ३ गुणांची कमाई केली. बंगाल वॉरियर्सच्या मणिंदर सिंह आणि रविंद्र कुमावत यांनी चढाईमध्ये चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही यू मुम्बाच्या बचावपटूंनी फारसं चालू दिलं नाही. अखेर यू मुम्बाने ३१-२० च्या फरकाने सामन्यात बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2018 10:51 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 u mumba beat bengal warriors retain top position in group a
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : डुबकी किंग प्रदीप नरवालचा ऐतिहासीक विक्रम
2 Pro Kabaddi Season 6 : गुजरातवर मात करत यू मुम्बा अ गटात अव्वल
3 Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीला सिद्धार्थ देसाईचा कोल्हापूरी दणका
Just Now!
X