News Flash

Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर यू मुम्बाचा विजयाने शेवट, तामिळ थलायवाजवर केली मात

यू मुम्बा अ गटात अव्वल

आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या यू मुम्बाने इंटर झोन चॅलेंज प्रकारात तामिळ थलायवाजवर ३६-२२ ने मात केली आहे. यू मुम्बाच्या संघाने केलेल्या अष्टपैलू खेळापुढे तामिळ थलायवाजचा संघ आपली छाप पाडू शकला नाही. या विजयासह यू मुम्बाने अ गटात आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या सामन्यात गतविजेते पाटणा विजयी, दिल्ली पराभूत

पहिल्या सत्रात तामिळ थलायवाजने यू मुम्बाला चांगली टक्कर दिली. मात्र यू मुम्बाने वेळेतच स्वतःला सावरत सामन्यात पुनरागमन केलं. दर्शन कादियान-सिद्धार्थ देसाई यांनी पहिल्या सत्रात यू मुम्बाचं आव्हान कायम राखलं. दुसऱ्या बाजूने विनोद कुमारनेही बचावात दोघांनाही चांगली साथ दिली. या खेळाच्या जोरावर यू मुम्बाने मध्यांतराला १८-१२ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रानंतर तामिळ थलायवाजचा संघ सामन्यात पुनरागमन करेल अशी सर्वांना आशा होती, मात्र ती देखील फोल ठरली. दुसऱ्या सत्रात यू मुम्बाच्या बचावफळीने फॉर्मात येत तामिळ थलायवाजच्या प्रमुख खेळाडूंना आपल्या जाळ्यात अडकवलं. कर्णधार फजल अत्राचली, सुरिंदर सिंह-रोहित राणा जोडीने सुरेख गुणांची कमाई करत आपल्या संघाचं पारडं जड ठेवलं. बदली खेळाडू अबुफजल मग्शदुलूनेही दुसऱ्या सत्रात काही चांगले गुण मिळवले. उद्यापासून प्रो-कबड्डीचे सामने अहमदाबादमध्ये रंगणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 10:35 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 u mumba finish their home league matches on winning note beat tamil thalaivas
टॅग : Pro Kabaddi 6,U Mumba
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या सामन्यात गतविजेते पाटणा विजयी, दिल्ली पराभूत
2 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर यू मुम्बाचाच दणका, बंगळुरु बु्ल्सवर केली मात
3 Pro Kabaddi Season 6 : हरयाणा विरुद्ध तामिळ थलायवाज सामना बरोबरीत
Just Now!
X