News Flash

Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बा अ गटात पुन्हा अव्वल, दबंग दिल्लीवर केली मात

यू मुम्बाचा अष्टपैलू खेळ

दिल्लीचा कर्णधार जोगिंदर नरवालला बाद करताना सिद्धार्थ देसाई

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात यू मुम्बाने अ गटात आपलं अव्वल स्थान पुन्हा एकदा कायम राखलं आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात यू मुम्बाने दबंग दिल्लीचा 39-23 असा धुव्वा उडवला. चढाईपटू आणि बचावफळीचा अष्टपैलू खेळ हे यू मुम्बाच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं आहे.

सामन्याच्या पहिल्याच सत्रापासून यू मुम्बाने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. सिद्धार्थ आणि रोहित बालियानने आक्रमक चढाया रचत दबंग दिल्लीच्या बचावफळीला खिंडार पाडलं. या आक्रमणामुळे लय बिघडलेला दिल्लीचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. अभिषेक सिंहनेही सामन्यात चांगली कामगिरी बजावली. दुसऱ्या बाजूने यू मुम्बाच्या बचावपटूंनीही आज जोरदार खेळ केला. सुरिंदर सिंह, फजल अत्राचली, रोहित राणा यांनीही संघाची आघाडी कायम राखण्यात महत्वाची भूमिका बजावली.

दुसरीकडे दिल्लीच्या बचावफळीने आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. विशाल माने, रविंदर पेहल या अनुभवी खेळाडूंना आज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या चढाईपटूंनी या दोन्ही खेळाडूंना लक्ष्य करुन संघाबाहेर केलं. कर्णधार जोगिंदर नरवालने 3 गुणांची कमाई केली, मात्र तोपर्यंत यू मुम्बाने आपला विजय सुनिश्चीत केला होता. दिल्लीकडून चढाईमध्ये चंद्रन रणजीतने एकाकी झुंज दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 9:24 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 u mumba gain top position in group a beat dabang delhi
टॅग : Pro Kabaddi 6,U Mumba
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर बंगळुरु बुल्स पहिल्याच सामन्यात पराभूत
2 Pro Kabaddi Season 6 : गुजरात फॉर्च्युनजाएंटची हरयाणा स्टिलर्सवर मात
3 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाची हाराकिरी; पिछाडी भरुन काढत गुजरातची सामन्यात बाजी
Just Now!
X