28 February 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 – दिग्गज खेळाडूंना मागे टाकत यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईची यशस्वी चढाई

सिद्धार्थ चढाईत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू

पाटणा पायरेट्सविरुद्ध सामन्यात सिद्धार्थ देसाई

कोणत्याही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत सहाव्या हंगामात मैदानामध्ये उतरलेल्या यू मुम्बाने सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. 38 सामन्यांनंतर यू मुम्बाने अ गटात 29 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान कायम राखलं आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये यू मुम्बाला फक्त एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालने मोडला राहुल चौधरीचा विक्रम

यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने आक्रमक खेळ करत सर्व प्रमुख चढाईपटूंना मागे टाकलं आहे. सहाव्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सिद्धार्थ देसाई चढाईत सर्वाधिक गुणांची कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. सिद्धार्थने नितीन तोमर, प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, मोनू गोयत या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं आहे.

सहाव्या हंगामात चढाईत सर्वाधिक गुणांची कमाई करणारे 10 चढाईपटू –

1) सिद्धार्थ देसाई – यू मुम्बा (7 सामन्यांमध्ये 97 गुण)

2) नितीन तोमर – पुणेरी पलटण (10 सामन्यांमध्ये 94 गुण)

3) प्रदीप नरवाल – पाटणा पायरेट्स (7 सामन्यांमध्ये 88 गुण)

4) अजय ठाकूर – तामिळ थलायवाज (8 सामन्यांमध्ये 87 गुण)

5) विकास कंडोला – हरयाणा स्टिलर्स (9 सामन्यांमध्ये 68 गुण)

6) पवन कुमार शेरावत – बंगळुरु बुल्स (4 सामन्यांमध्ये 60 गुण)

7) श्रीकांत जाधव – यूपी योद्धा (7 सामन्यांमध्ये 57 गुण)

8) प्रशांत कुमार राय – यूपी योद्धा (7 सामन्यांमध्ये 55 गुण)

9) मोनू गोयत – हरयाणा स्टिलर्स (7 सामन्यांमध्ये 54 गुण)

10) मणिंदर सिंह – बंगाल वॉरियर्स (5 सामन्यांमध्ये 49 गुण)

(विशेष सुचना – ही आकडेवारी 28 ऑक्टोबरपर्यंतच्या सामन्यांपर्यंतची आहे)

First Published on October 29, 2018 3:57 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 u mumba siddarth desai becomes number 1 raider
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालने मोडला राहुल चौधरीचा विक्रम
2 Pro Kabaddi Season 6 : हरयाणाचा बचाव भेदण्यात पाटणा अपयशी, सलग दुसरा पराभव
3 Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या लढाईत उत्तर प्रदेशची दिल्लीवर मात
Just Now!
X