News Flash

Pro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम

सिद्धार्थ देसाईवर यू मुम्बाच्या आक्रमणाची मदार

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात यू मुम्बाच्या संघाने आतापर्यंत सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. लिलावात अनुभवी खेळाडूंना डावलून नवोदीतांना संधी देणाऱ्या यू मुम्बाच्या प्रशासनावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये यू मुम्बाच्या युवा संघाने आपली चांगलीच छाप पाडली आहे. यू मुम्बाच्या संघातील मराठमोळा चढाईपटू सिद्धार्थ देसाईने, प्रो-कबड्डीतील अनुभवी खेळाडू अनुप कुमारचा विक्रम मोडून काढला आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये सर्वात जलद ५० बळी घेण्याचा विक्रम आता सिद्धार्थ देसाईने आपल्या नावावर केला आहे.

यू मुम्बा विरुद्ध हरयाणा स्टिलर्स सामन्यात सिद्धार्थ देसाईने दोन सुपर रेड करत एकूण १५ गुण कमावले. यासह आपल्या चौथ्या सामन्यातचं सिद्धार्थने ५० गुणांची कमाई केली. अनुप कुमारने ५ सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता. प्रो-कबड्डीचे पहिले ५ हंगाम अनुप कुमार यू मुम्बाचं नेतृत्व करत होता, यंदाच्या हंगामात तो जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळतो आहे.

प्रो-कबड्डीच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० गुण मिळवणारे चढाईपटू –

१) सिद्धार्थ देसाई – ४ सामने
२) अनुप कुमार – ५ सामने
३) अजय ठाकूर – ५ सामने

सिद्धार्थ देसाईची पहिल्या ४ सामन्यातील कामगिरी:

सामने – ४
चढाईत गुण -५१
सुपर टेन – ०३
सुपर रेड – ०२
सरासरी गुण – १२.७५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 2:22 pm

Web Title: pro kabaddi 2018 season 6 u mumba yound raider siddharth desai broke anup kumar record
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : गुजरात ठरलं ‘फॉर्च्युनजाएंट’, पुणेरी पलटणवर केली मात
2 Pro Kabaddi Season 6 : हरयाणा स्टिलर्सची दबंग दिल्लीवर मात
3 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा हरयाणा स्टीलर्सवर विजय
Just Now!
X