प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वातील इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत पुणेरी पलटणला घरच्या मैदानावर खेळताना पराभवाचा सामना करावा लागला आहे. उत्तर प्रदेश योद्धा संघाने पुणेरी पलटणवर 29-23 ने मात केली. पुण्याच्या बचावफळीने आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. उत्तर प्रदेशच्या प्रशांत कुमार राय, श्रीकांत जाधव आणि रिशांक देवाडीगा यांनी चढाईत महत्वाचे गुण मिळवत पुण्याच्या बचावफळीला खिंडार पाडलं. पुण्याचा एकही खेळाडू उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंवर ताबा मिळवू शकला नाही.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : हरयाणाच्या पराभवाची मालिका सुरुच, बंगळुरु बुल्सची बाजी

Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: शशांक-आशुतोषची भागीदारी ठरली व्यर्थ, हैदराबादचा पंजाबवर २ धावांनी निसटता विजय
IPL 2024 CSK vs GT Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
CSK vs GT Match Preview: शुबमन गिल वि ऋतुराज गायकवाड, चेपॉकच्या मैदानावर युवा कर्णधारांमध्ये मुकाबला; अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

प्रशांत कुमार रायने चढाईत सर्वाधिक 8 गुणांची कमाई केली. पुणेरी पलटणकडून मोनू, नितीन तोमर यांनी काही चांगल्या गुणांची कमाई केली, मात्र यापैकी एकाही खेळाडूच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या बचावपटूंनीही काही चांगल्या पकडी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. शुक्रवारपासून प्रो-कबड्डीचे सामने पाटणा शहरात सुरु होतील.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : बंगळुरु बुल्सचे सामने पुण्याच्या मैदानात हलवले