प्रो कबड्डी  लीग

अनुभवी चढाईपटू अजय ठाकूरने केलेल्या सुरेख चढाया व सुकेश हेगडचा अप्रतिम बचाव या बळावर तमिळ थलायवा संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी तेलुगू टायटन्सवर २७-२३ अशी मात केली. दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने गुजरात फॉच्युनजाएंट्सवर २९-२६ असा विजय मिळवला. दिल्लीच्या मिराज शेखने एकूण सात गुण मिळवले. गुजरातकडून सचिनने सर्वाधिक नऊ गुण मिळवले, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरे पडले.