26 November 2020

News Flash

थकीत वीज देयकांचे १०० कोटी जमा!

पुणे विभागात ग्राहकांचा प्रतिसाद; टाळेबंदीनंतर ७९४ कोटींची थकबाकी

पुणे विभागात ग्राहकांचा प्रतिसाद; टाळेबंदीनंतर ७९४ कोटींची थकबाकी

पुणे : करोनाच्या प्रादुर्भावातील टाळेबंदीनंतर वीजबिलांचा भरणा ५० टक्क्य़ांनी खाली आल्याने थकबाकीचा डोंगर वाढत असताना महावितरणकडून विविध माध्यमांतून ग्राहकांशी थेट संपर्क साधून वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण विभागातील ६८ हजार ग्राहकांनी त्यास प्रतिसाद देऊन सुमारे १०० कोटी रुपयांच्या थकीत बिलांचा भरणा केला आहे. टाळेबंदीनंतरच्या कालावधीपासून आजवर पुणे विभागात ११ लाख ६५ हजार ग्राहकांकडे ७९४ कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

थकबाकीच्या बिकट स्थितीत ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे, त्यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलांबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचेही निवारण करण्यात येत आहे. यापूर्वी टाळेबंदीच्या कालावधीतील वीजबिलांबाबत निर्माण झालेल्या शंका निरसन करण्यासाठी पुणे परिमंडलअंतर्गत गेल्या जूनपासून आतापर्यंत ९७ वेबिनार व ११५ मेळावे घेण्यात आले.

ग्रामीण भागातूनही ३२ कोटी वसूल

थेट संपर्क साधून वीजबिलांचा भरणा करणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत पुणे परिमंडलातील ६८ हजार ३०० थकबाकीदारांनी ९९ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये पुणे शहरातील २६ हजार ७२५ ग्राहकांनी ४३ कोटी ६० लाख, पिंपरी व चिंचवड शहरातील १६ हजार ९०० ग्राहकांनी २३ कोटी ९० लाख आणि आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यातील २४ हजार ७०० ग्राहकांनी ३२ कोटी १० लाख रुपयांचा भरणा केला आहे.

महावितरणचे आवाहन

मार्च महिन्यापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुणे परिमंडलात अहोरात्र ग्राहकसेवा देण्यात येत आहे. मात्र, वीजबिले व थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरण सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करून थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले.  www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळावर वीजबिलांचा भरणा करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:19 am

Web Title: 100 crore received for overdue electricity bills zws 70
Next Stories
1 ६१ टक्के नागरिक करोना लशीबाबत साशंक
2 पुण्याला करोनाचा विखळा कायम, गुरुवारी ३६९ रुग्णांची भर; २१ जणांचा मृत्यू
3 पुण्यात बहिणीच्या नवऱ्याने अल्पवयीन मेहुणीचं केलं अपहरण
Just Now!
X