News Flash

पुणे शहरात मागील २४ तासात १०२४ रुग्ण पॉझिटिव्ह तर पिंपरीत ६२३ रुग्ण पॉझिटिव्ह

पुण्यात ४३ रुग्णांचा तर पिंपरीत २१ जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १०२४ रुग्ण आढळल्याने १ लाख ४७ हजार ३५१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १२०९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख २७ हजार ६३९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने ६२३ करोना बाधित रुग्ण आढळले असून २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४० जण करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ७९ हजार ३३८ वर पोहचली असून पैकी ६७ हजार ६३ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ३  हजार ७८४ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 10:05 pm

Web Title: 1024 corona cases in pune 623 corona cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून सात जणांनी ५० लाखांची दारु पळवली
2 देशात दडपशाही, अघोषित हुकमाशाही-अमोल कोल्हे
3 “मला वाटत ते रात्री कपडे घालूनच तयार असतात”; पाटलांच्या प्रश्नावर पवारांचा ‘फ्री हिट’
Just Now!
X