पुणे विभागात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आात १,०३१ वर पोहोचली आहे. यांपैकी १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात ४७ लाख ५१ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या माध्यमातून १ कोटी ८२ लाख ७१ हजार ८५७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
nmmc chief dr kailas shinde visit municipal corporation hospitals in vashi
औषधचिठ्ठी न देण्याच्या धोरणाचे काटेकोर पालन करा; नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

तसेच पुणे जिल्हयात ९३६ बाधीत रुग्ण असून ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात २१ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ३७ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २७ बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १० बाधीत रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.