News Flash

निजामुद्दीनच्या तब्लिगी –ए- जमात मेळाव्यातील 106 जण पुणे विभागात आढळले

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी-ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागामधील 182 जणांची यादी मिळाली असून यातील 106 आढळून आले आहेत. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आणखी वाचा- तबलिगी मर्कझ: पुण्यातील ९२ लोकांचा कार्यक्रमात सहभाग, काहींवर उपचार सुरु – महापौर

यावेळी दीपक म्हैसेकर म्हणाले की, निजामुद्दीन येथील तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनाकडे आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. तर 182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 106 जणांना शोधून काढून त्यातील 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ते पुढे म्हणाले की, आता या सर्वांचे नमुने घेतली जातील आणि त्यानंतर येणार्‍या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 5:06 pm

Web Title: 106 persons found in pune region who involved nizamuddins tabiligi jamat rally msr 87 svk 88
Next Stories
1 पुणे महापालिकेत सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाकडे दुर्लक्ष!
2 तबलिगी मर्कझ: पुण्यातील ९२ लोकांचा कार्यक्रमात सहभाग, काहींवर उपचार सुरु – महापौर
3 तबलिगी मर्कझ : पुण्यातील ६० जण क्वारंटाइनमध्ये, इतरांचा शोध सुरू -जिल्हाधिकारी
Just Now!
X