News Flash

पिंपरी चिंचवडमध्ये १०८ नवे करोना बाधित

एकूण बाधितांची संख्या १४७४

प्रतिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक १०८ करोना बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दापोडी येथील ६५ वर्षीय, दिघी येथील ४३ वर्षीय आणि शिरपूर धुळे येथील ६६ वर्षीय पुरुषांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आज ९५ जण करोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत १ हजार २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत ४७ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या १४७४ पोहचली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 10:20 pm

Web Title: 108 new corona patients in pimpri chinchwad scj 81 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक : चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून अज्ञात महिला पसार
2 एकाच भागात ३ आत्महत्यांच्या घटनांनी हादरलं पिंपरी-चिंचवड
3 माऊली न आल्याने खंडेरायाची जेजुरी नगरी सुनी सुनी
Just Now!
X