प्राइड पर्पल ग्रुप, रामा ग्रुप आणि कोहिनूर ग्रुप या बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नातून भूगावच्या निसर्गरम्य परिसरात ‘११५ हिलटाऊन’ या भव्य प्रकल्पांतर्गत ‘हिलटाऊन २’ आणि ‘हिलटाऊन ४’ हे गृहप्रकल्प साकारले जाणार आहेत.
शहरापासून उंचीवर, निसर्गाच्या हवेशीर गारव्यामध्ये, आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत आणि सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असे प्रकल्प असतील. ११५ हिलटाऊन या भव्य प्रकल्पांतर्गत शाळा, दुकाने, क्लब, स्क्व्ॉश कोर्ट, टेनिस कोर्ट, स्वीमिंग पूल, खुले अ‍ॅम्फी थिएटर या सुविधांसह ऐसपैस काँक्रिटचे रस्ते असतील. या दोन गृहप्रकल्पांसाठी बहुउद्देशीय सभागृह, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, पार्टी लॉन, ज्येष्ठांसाठी खास जागा, सायकल ट्रॅक, लँडस्केप गार्डन अशा सुविधा असतील. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करण्याचा पुरेपूर आनंद येथील रहिवाशांना घेता येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. प्राइड पर्पल ग्रुपचे सहव्यवस्थापकीय संचालक श्रवण अगरवाल, रामा ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोती पंजाबी, संचालक जितू पंजाबी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संचालक राजेश गोयल, प्राइड पर्पल ग्रुपचे विक्री आणि विपणन उपाध्यक्ष राजेश नारंग उपस्थित होते.