News Flash

पुण्यात दिवसभरात १,१६० तर पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले १,०२४ करोनाबाधित रुग्ण

पुण्यात १६ जणांचा तर पिंपरी-चिंचवडमध्ये १० जणांचा आज झाला मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ११६० रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४९ हजार २१७ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या ८९६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर २९ हजार ४८९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार २४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यांपैकी, ४३ जण ग्रामीण भागातील असून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या १७ हजार २६४ वर पोहचली असून यांपैकी ११ हजार ५३० जण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, आज ६९९ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३ हजार ४५१ जण हे सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 9:25 pm

Web Title: 1160 corona patients found in pune and 1024 in pimpri chinchwad aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “करोना लस यशस्वी झाल्यानंतर सरकारकडे…”; सिरम इन्स्टिट्यूटची महत्त्वाची माहिती
2 पिंपरी-चिंचवडमध्ये आईनेच केला चार वर्षीय चिमुकलीचा खून
3 सरकारच्या नाकर्तेपणामुळं मराठा समाजाच्या भरतीला अप्रत्यक्ष स्थगिती – विनायक मेटे
Just Now!
X