पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार १९२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, २८ रुग्णांचा आज मृत्यू झाला. करोनाबाधितांची संख्या ५९ हजार ४९६ वर पोहचली आहे.

आजपर्यंत शहरात १ हजार ४१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ३१२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर ४१ हजार २५१ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ६२९ नवे करोनाबाधित आढळले असून, १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायकबाब म्हणजे, दिवसभरात ९०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ३११ वर पोहचली आहे. यापैकी १७ हजार १०६ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिका रुग्णालयात ३ हजार ७८३ सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.