02 March 2021

News Flash

पुण्यात दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू ; १४३ नवे करोनाबाधित

करोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार २०५ वर पोहचली

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात आज दिवसभरात १४३ नवे करोना रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला.  करोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार २०५ झाली आहे.  आज अखेर ४०३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११९ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर ५ हजार ३०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला अॅक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार २८९ झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 8:43 pm

Web Title: 12 patients die in pune in a day 143 new corona patients msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड : वॉटर हार्वेस्टिंगच्या खड्ड्यात अडकलेल्या गायीला मिळाले जीवनदान
2 पिंपरी-चिंचवड : क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडण्यासाठी नागरिकांचा गोंधळ
3 पुण्यातील तीन वर्षांची अंशिका म्हणते, उद्धवकाका इकडे येऊ नका करोना आहे ना…
Just Now!
X