विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीतर्फे नेपाळमधील काठमांडू येथे १२० भूकंपरोधक, टिकाऊ घरांची निर्मिती करण्यात आली आहे. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (२१ मे) तारकेश्वर येथे या घरांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
काठमांडू येथे तारकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत, तारकेश्वर नगरपालिका आणि नेपाळ सरकारच्या सहकार्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि भगवान गौतम बुद्ध विश्वशांतीनगर अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी या घरांची निर्मिती करण्यात आली आहे. मानव एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम, अयोध्या येथील रामजन्मभूमी शिलान्यासाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती यांच्यासह नेपाळचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.
समाजहिताच्या उपक्रमांतर्गत, गोरगरिबांसाठी उभारण्यात आलेले प्रत्येक घर सुमारे २०० चौरस फुटांचे असून शौचालय, स्वच्छतागृह, पाण्याचे नळ अशा आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुढची किमान ३० ते ४० वष्रे नसíगक आपत्तींना सहजपणे तोंड देतील अशा स्वरूपाची छोटीशी, तरीही देखणी व टिकाऊ भूकंपरोधक अशा प्रकारची घरे तयार करण्यात आली आहेत.