पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १२१३ नवे रुग्ण आढळल्याने आत्तापर्यंतची रुग्णसंख्या  ५० हजार ४३० झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ३३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार २१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ५९१ रुग्णांना तब्बेत ठणठणीत असल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ३० हजार ८० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक १ हजार १८१ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४३२ जण करोनामुक्त झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १८ हजार ३९२ वर पोहचली आहे. यापैकी ११ हजार ९६२ जण करोनामुक्त झाले आहेत. ३ हजार ५५० जण सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.