News Flash

अनंत चतुर्दशीला दणदणाट!

१५००० युवकांच्या सहभागाने १२५ ढोल-ताशा पथके

अनंत चतुर्दशीला दणदणाट!

१५००० युवकांच्या सहभागाने १२५ ढोल-ताशा पथके

अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विविध मिरवणुकींमध्ये जवळपास १२५ ढोल-ताशा पथके सहभागी होणार असून, साधारण १५ हजार युवक-युवती यात सहभागी होणार आहेत. या दिवशी शहरात तीन हजारांहून ढोलांचा दणदणाट होणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीचा दिवस शहर ढोल-ताशांच्या दणदणाटात बुडून जाणार आहे. या वर्षी शहरातील ढोल-ताशा पथकांची संख्या ही शहरात १२५, तर राज्यभरात साडेतीनशेच्यावर पोहोचली आहेत. य्प्रत्येक पथकाचे किमान २५ असे साधारण ३ हजारांहून ढोल मिरवणुकीच्या दिवशी शहरभर घुमणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या मिरवणुकीच्या मुख्य मार्गाबरोबरच शहराच्या उपनगरांमध्ये आणि इतर रस्त्यांवरही या वर्षी ढोल-ताशा पथके आहेत, अशी माहिती ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी दिली.

गेली अनेक वर्षे आपल्या वादनाने लौकिक मिळवलेल्या पथकांचे वादन मुख्य मिरवणुकीत पाहता येणार आहे. शिवगर्जना, समर्थ प्रतिष्ठान, गजलक्ष्मी, स्वरूपवर्धिनी, ज्ञानप्रबोधिनी, शिवमुद्रा, नादब्रह्म, श्रीराम पथक यांच्यासह इतरही अनेक पथके मानाच्या गणपतीच्या आणि मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. या वर्षीही रात्री बारानंतर पारंपरिक वाद्यांना मिरवणुकीत परवानगी असल्यामुळे नव्या पथकांनाही मंडळांकडून मिरवणुकीची संधी देण्यात येत आहे.

आर्थिक गणित कोलमडले?

सर्वच ढोल-ताशा पथकांमध्ये असलेले तेच ताल, पथकांची भरमसाट वाढलेली संख्या यामुळे या वर्षी या पथकांना वादकांकडून मिळणारा प्रतिसाद घटला आहे. याचप्रमाणे ढोलाचे वाढलेले दर आणि त्या तुलनेत मंडळांकडून मिळणारी सुपारी (वादनाचे मानधन) कमी झाल्यामुळे पथकांना त्यांचे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, असे पथकातील वादकांनी सांगितले.

नियमांचे पालन कधी?

एका पथकात चाळीसपेक्षा अधिक वाद्ये असू नयेत,  एका मंडळाने दोनपेक्षा अधिक पथके ठेवू नयेत, असे नियम मिरवणुकीसाठी करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी आणि इतर दिवशीच्या मिरवणुका आणि स्थिरवादनात अनेक पथकांनी सर्रास टोलचा वापर केला. आता मिरवणुकीच्या सुरक्षितेसाठी आणि ती लवकर संपण्यासाठी करण्यात आलेले नियम मंडळे आणि पथके पाळणार का याबाबत प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 2:11 am

Web Title: 125 dhol tasha pathak ready for ganesh idol immersion
Next Stories
1 शांताबाई.. झिंग झिंग झिंगाट!
2 वाहतुकीचा यंदा वर्तुळाकार मार्ग
3 अजित पवारांनंतर पालकमंत्र्यांचाही भोसरी दौरा
Just Now!
X