News Flash

पुणे: आईने टीव्ही पाहू दिला नाही म्हणून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या 

टीव्ही पाहण्यावरुन आई ओरडली अन्...

(फाइल फोटो)

आईने टीव्ही पाहू दिला नाही म्हणून रागाच्या भरात एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. रमजान अब्दुल शेख असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना चिखली परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजानला टीव्ही पाहायला खूप आवडायचे. मात्र, यावरूनच त्याची आई त्याच्यावर कायम रागवायची. टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या अशाच एका वादाचा राग मनात धरुन रमजानने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. परंतू रमजानने गळफास लावल्याचं घरातील व्यक्तींच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवलं आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. रमजानला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारी रात्रीपासून रमजानची प्रकृती सातत्याने खालावत गेली. त्यामुळेच बुधवारी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 4:40 pm

Web Title: 13 year boy committed suicide after fight with mother over tv kjp 91 scsg 91
Next Stories
1 लग्न समारंभात वऱ्हाडी जास्त आल्याने मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल
2 भाजपाच्या गडाला खिंडार; पुणे-नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा
3 पुण्यात गुटख्यातील हवाला रॅकेट प्रकरणी ९ जण ताब्यात, साडेतीन कोटींची रोकड जप्त
Just Now!
X