News Flash

पुण्यात १३ वर्षीय मुलाने केली वडिलांची हत्या!

कात्रज परिसरातील जांभुळवाडी येथील धक्कादायक घटना

संग्रहित

”बहिणीला मारू नकोस, भांडण करू असे..” असे समजून सांगणार्‍या वडिलांचा त्यांच्या तेरा वर्षोय मुलानेच चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज परिसरातील जांभुळवाडीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दस्तगीर इमाम शेख (वय ४० रा. जांभुळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर खून करणाऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जांभुळवाडीमध्ये दस्तगीर इमाम शेख हे पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत घरी होते. दरम्यान, बहीण-भावाचं भांडण सुरू झाल्याने, त्यावर दस्तगीर यांनी त्यांना समाजावून सांगत, भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला व ते कांदा चिरत बसले होते. दरम्यान तोच चाकू घेऊन त्यांच्या तेरा वर्षी मुलाने त्यांना भोसकले. यामुळे ते एका बाजूला पडले, त्यांनतर त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 8:36 pm

Web Title: 13 year old boy kills father in pune msr 87
Next Stories
1 पुणे – कमिन्स कंपनीत ५० कामगार आढळले अ‍ॅक्टिव्ह करोना रूग्ण!
2 “आमच्यासाठी ईडी म्हणजे रिक्षाचालक,” गिरीश बापटांचं वक्तव्य
3 रस्ते काँक्रिटीकरण झाडांच्या मुळांवर
Just Now!
X