News Flash

निधीमुळे गती

  सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद

पुणे :  सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली १३५ कोटींची तरतूद करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. तसेच आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामांना गती मिळणार असून येत्या काही दिवसांत कामासाठीची निविदा प्रक्रिया महापालिके कडून राबविण्यात येणार आहे.

उड्डाणपुलाच्या कामासाठी यापूर्वी दोन वेळा पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. तांत्रिक छाननी समितीनेही त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र करोना संसर्गामुळे निविदा प्रक्रियांना प्रतिसाद मिळाला नाही. मुदतवाढीनंतर चढय़ा दराने निविदा आल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यापूर्वीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यातच आता १३५ कोटी एवढी प्रकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरात मोठय़ा प्रमाणावर झालेले नागरीकरण लक्षात घेता आणि पर्यायी रस्त्यांचा अभाव असल्याने या रस्त्यावर उड्डाण पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून महापालिके च्या अंदाजपत्रकात त्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. तीन वर्षांतच हा उड्डाण पूल पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तीन वर्षांत के वळ तांत्रिक कामे करण्यातच वेळ गेल्याने वाहनचालकांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

प्रस्तावित उड्डाण पुलाची लांबी एकू ण २.५ किलोमीटर एवढी आहे. दोन टप्प्यात उड्डाण पूल उभारण्यात येणार असून स्वारगेटहून वडगांव धायरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कु ठेही न थांबता थेट फनटाइम चित्रपटगृहापर्यंत जाता येणार आहे. तसेच वडगांव धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. महापालिके च्या प्रकल्प विभागाच्या आर्थिक आराखडय़ानुसार उड्डाण पुलासाठी १३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

पर्यायी रस्त्याचा अभाव

स्वारगेटपासून विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, सनसिटी, धायरी, वडगांवपासून पुढे सिंहगड किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ या रस्त्यावर गर्दी असते. त्यातच पदपथही अतिक्रमणांनी व्यापले आहेत. या रस्त्याला पर्यायी रस्ता करण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यानुसार महापालिके ने नदीपात्रातून विठ्ठलवाडी ते वारजे हा रस्ता विकसित के ला होता. मात्र पर्यावरण प्रेमींनी या रस्त्याला विरोध के ल्याने हा रस्ता न्यायालयाच्या आदेशानुसार उखडून टाकावा लागला. सध्या विठ्ठलवाडीपासून फनटाइम चित्रपटगृहापर्यंत कालवा रस्ता विकसित करण्यात आला आहे.

उड्डाण पुलाची रचना

  • विठ्ठलवाडी ते फनटाइन चित्रपटगृह (वडगांव धायरीकडे जाण्यासाठी)
  • इंडियन ह्य़ूम पाइप ते भारत पेट्रोलियम-हिंगणे (स्वारगेटकडे येण्यासाठी)
  • विठ्ठलवाडी ते बाजी पासलकर उड्डाण पूल (स्वारगेटकडे येण्यासाठी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 3:00 am

Web Title: 135 crore provision flyover sinhagad road ssh 93
Next Stories
1 विलीनीकरणावर शासनाचे शिक्कामोर्तब
2 निगडी स्मशानभूमीत करोनाबाधित मृतदेहांची विटंबना?
3 योगेश लेले यांनी तयार केलेल्या घडय़ाळांच्या डायलचे अमेरिकेतील प्रदर्शनात दालन
Just Now!
X