News Flash

१४ लाख थकबाकीदारांची वीज लवकरच खंडित

महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा.

१४ लाख थकबाकीदारांची वीज लवकरच खंडित
(संग्रहित छायाचित्र)

दहा महिन्यांमध्ये एकदाही वीजबिलाचा भरणा न करणारे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तब्बल १४ लाख ग्राहक असून, या सर्वाचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दूरचित्र संवादाद्वारे आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. १ एप्रिल २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवडय़ांत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा. आवश्यकता असल्यास हप्त्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक १२ लाख ६८ हजार ४८७ असून त्यांच्याकडे ८५६ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ लाख ३८ हजार ८७० वाणिज्यिक ग्राहकांकडे २६४ कोटी ३२ लाख आणि २२ हजार ४५४ औद्योगिक ग्राहकांकडे १२६ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे. वीजबिलांबाबत शंका, तक्रारींचे निरसन तसेच विनंती करून देखील प्रतिसाद नसल्याने या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याची कटू कारवाई सुरू करण्यात येत असल्याचे नाळे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:29 am

Web Title: 14 lakh arrears power outage soon abn 97
Next Stories
1 वयोमर्यादेच्या निर्णयामुळे पहिल्याच वर्षांत देशात ७० लाख वाहने भंगारात
2 पुणे विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी, ऑनलाइन!
3 नागरिकांच्या जिवाशी खेळ
Just Now!
X