News Flash

कबड्डी सामन्यादरम्यान १४ वर्षीय खेळाडूचा मृत्यू, शिरुर तालुक्यातली धक्कादायक घटना

शनिवारी संध्याकाळी घडली घटना

कबड्डी सामन्यादरम्यान गौरव कोसळला तो क्षण

पुणे जिल्ह्यातील पिंपळे जगताप भागात एका तरुण कबड्डीपटूचा सामन्यादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. गौरव अमोल वेताळ असं या १४ वर्षीय खेळाडूचं नाव असून ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास घडल्याचं बोललं जातंय. पिंपळे जगताप येथील नवोदय विद्यालयाच्या मैदानावर गौरव आपल्या संघाकडून कबड्डी खेळत होता, गौरवसारख्या तरुण कबड्डीपटूच्या जाण्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव आपल्या संघाकडून नवोदय विद्यालयाच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी आला होता. शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामना खेळत असताना गौरव चक्कर येऊन अचानक जमिनीवर कोसळला. सर्वप्रथम मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी आणि खेळाडूंना नेमकं काय घडलंय याची कल्पना आली नाही. मात्र गौरव उठत नसल्याचं पाहताच काही शिक्षकांनी मैदानात धाव घेऊन, यानंतर उपस्थित शिक्षकांनी गौरवला जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु करण्यापुर्वीच गौरवने आपले प्राण सोडले होते. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे गौरवला आपले प्राण गमवावे लागले याबद्दल डॉक्टरांनी ठोस माहिती दिलेली नाहीये.

गौरव हा पिंपळे जगताप परिसरातला होतकरु कबड्डीपटू म्हणून सर्वांना परिचीत होता. ही घटना घडल्यानंतर गौरवच्या शिक्षकांनी फोनवरुन त्याच्या बहिणीला माहिती दिली. मात्र कुटुंबिय रुग्णालयात पोहचेपर्यंत गौरवची प्राणज्योत मालवली होती. गौरवच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली असून, शिक्रापूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 11:51 am

Web Title: 14 year old kabaddi player lost his life on ground while playing kabaddi
Next Stories
1 अबब!! तब्बल ४० यार्ड अंतरावरुन झ्लाटान इब्राहीमोव्हीचचा अचूक गोल
2 फलंदाज म्हणून स्टीव्ह स्मिथबद्दल मला अजुनही आदर – अजिंक्य रहाणे
3 लुटुपुटूच्या लढाईतही भारताची कसोटी
Just Now!
X