News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये १५ लाखाचा मांडूळ जातीचा साप जप्त; एकाला अटक

पैशांचा पाऊस, दुर्धर आजारावर उपयासाठी या सापाचा उपयोग होतो, असे अनेक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये असल्याची पोलिसांनी दिली माहिती.

पिंपरी-चिंचवडमध्ये मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १५ लाख रुपये किंमत असलेले मांडूळ पोलिसांनी हस्तगत केले असून, ते वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केले आहे. योगेश मरिआप्पा म्हेत्रे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात व्यक्ती हा मांडूळ जातीचा साप विक्री करण्यास येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वनरक्षक सुरेश बरले यांना याची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित ठिकाणी भोसरी पोलिसांनी सापळा रचला, संशयितरित्या थांबलेल्या म्हेत्रेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पोत्यातील डब्ब्यात १५ लाख रुपये किंमतीचे मांडूळ आढळून आले. तो मांडूळ विक्रीसाठी आणला होता अस त्याने पोलिसांना सांगितलं आहे.

मांडूळ जातीच्या सापाचे रक्त हे दुर्धर आजारांवर औषध म्हणून वापरले जाते. तसेच मांडूळबद्दल अनेक अंधश्रद्धा असल्याने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी देखील मांडूळ खरेदी केले जाते, असं भोसरी पोलिसांनी सांगितल आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 10:29 pm

Web Title: 15 lakh cost mandul breed snake seized in pimpri chinchwad one arrested msr 87 kjp 91
Next Stories
1 पुण्यात नामांकित कंपनीच्या दोन डिलिव्हरी बॉयसह अन्य एकास अटक!
2 अदर पूनावाला लंडनहून भारतात परतले; Y Category सुरक्षा दिली जाणार
3 ‘एआयसीटीई’कडून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक जाहीर
Just Now!
X