पुण्यात 15 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही हत्या झाली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. हत्येनंतर वारजे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरु आहे. पैशांसाठी हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
निखिल असं मृत मुलाचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. पैशांसाठी विनय राजपूत याने त्याची हत्या केल्याचं कळत आहे. पोलिसांनी आरोपी विनय राजपूतला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 11:49 am