अनुदान समितीची पुनर्रचना करण्याची चित्रपट महामंडळाची मागणी

विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी

पुणे : दीडशे मराठी चित्रपट  सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी बरखास्त केलेल्या चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केली आहे.

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून राज्य सरकार चित्रपटांनाम अनुदान देते.  चित्रपटांना अनुदान देण्यासाठी राज्य शासनातर्फे समितीची स्थापना केली जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनुदान समिती बरखास्त झाली.

चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करावी, अशी मागणी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली असल्याची माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

चित्रपट अनुदान समिती साधारणपणे दोन महिन्यांतून एकदा एकत्र येते. एका बैठकीमध्ये चित्रपट पाहून समितीकडे आलेल्या चित्रपटांपैकी १५ ते २० चित्रपटांना अनुदान मंजूर केले जाते. गेल्या तीन-चार महिन्यांपासून अशा स्वरूपाची बैठक झालेली नाही. त्यामुळे चित्रपट अनुदान समितीची नव्याने स्थापना करून अधिकाधिक चित्रपटांना अनुदान मंजूर करावे, अशी मागणी देशमुख यांना पाठविलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे.

कलाकारांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मुंबई आणि पुणे येथे चित्रपट महामंडळाला भूखंड द्यावा. त्याचा विकास करून महामंडळ अधिकाधिक कलाकारांच्या निवासाचे प्रश्न मार्गी लावू शकेल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

गुणांकनाऐवजी दर्जानुसार अनुदान द्यावे

मराठी चित्रपटांसाठी सध्या राज्य सरकारतर्फे ४० लाख रुपये आणि ३० लाख रुपये अशा दोन श्रेणींमध्ये अनुदान दिले जाते. त्यासाठी गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जातो. समिती चर्चा करून चित्रपटाचे गुण निश्चित करते आणि त्यानुसार अनुदान दिले जाते. गुणांकन पद्धतीमध्ये काही चित्रपट नाकारले जातात. हे ध्यानात घेता चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वीप्रमाणे ‘क’ दर्जा असला पाहिजे, अशी मागणी केली असल्याचे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.