पुणे : गेल्या दोन दशकांमध्ये अरबी समुद्राचे तापमान वाढल्याने तेथील  चक्रीवादळांच्या निर्मितीचे प्रमाण ५२ टक्क्यांनी वाढले आहे.  तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळांचे प्रमाणही १५० टक्क्यांनी वाढल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी  संयुक्त संशोधनात नोंदविला आहे.

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वातावरण आणि अवकाश विज्ञान विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरण आणि भूविज्ञान विभाग, रुरके लामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील पृथ्वी आणि वातावरणशास्त्र विभाग यांनी संयुक्त संशोधन के ले. त्यात मेधा देशपांडे यांच्यासह रॉक्सी कॉल मॅथ्यू, विनित कु मार सिंग, मानो क्रांती गनाधी, उमेश कु मार, आर. इमॅन्युएल यांचा सहभाग होता. या संशोधनावर आधारित चेजिंग स्टेटस ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन्स ओव्ह द नॉर्थ इंडियन ओशन हा शोधनिबंध क्लायमेट डायनॅमिक्समध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गेल्या चार दशकांचा अभ्यास करून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळे, झालेले बदल, आकडेवारी शोधनिबंधात मांडण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमध्ये घट

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचे प्रमाण ८ टक्क्यांनी कमी झाले आहे. उपसागरातील चक्रीवादळांच्या कालावधीमध्ये विशेष बदल झालेला नाही.

अरबी समुद्रातील उष्णता वाढण्यामागे जागतिक तापमानवाढ हे प्रमुख कारण आहे. वाढलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी उष्णता शोषून घेते. ही उष्णता समुद्रात जाते. त्यामुळे अरबी समुद्रातील तापमान वाढले आहे. येत्या काळातही अतितीव्र चक्रीवादळांची तीव्रता, वारंवारिता वाढण्याची शक्यता आहे.  – रॉक्सी कॉल मॅथ्यू, शास्त्रज्ञ