News Flash

पुण्यात दिवसभरात १५३ नवे करोनाबाधित, चौघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९१ करोनाबाधित रुग्णांची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात १५३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, चार रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ७४२ वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत एकूण ४ हजार ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या २२२ रुग्णांची तब्येत बरी झाल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज अखेर १ लाख ५६ हजार १४० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर ८१ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार ६०० वर पोहचली असून यापैकी, ८६ हजार ५२९ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 10:14 pm

Web Title: 153 new corona patients in a day in pune svk 88 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 घरी सोडतो सांगून तरुणीला लॉजवर नेऊन बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
2 अयोध्येत २०० फूट खोदकाम करुनही खडक लागला नाही- स्वामी गोविंददेव गिरी महाराज
3 “रावणासारखी भूमिका घेणाऱ्या राम कदम यांचं नामांतर केलं पाहिजे”
Just Now!
X