पुणे शहरात दिवसभरात १४८ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७८ हजार २० इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ६१७ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ४०९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६९ हजार ५७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ५८ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १७२ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९६ हजार १९५ वर पोहचली असून पैकी, ९२ हजार ९५१ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७४४ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.