24 September 2020

News Flash

पुणे : अल्पवयीन भाचीला अश्लील चित्रफीत दाखवणाऱ्या मावशीला अटक

मावशीचा प्रियकरही पोलिसांच्या ताब्यात

प्रतिकात्मक फोटो

लॉकडाउन काळात आपल्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करणाऱ्या मावशीला व तिच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल महिन्यात हा प्रकार घडल्याचं समोर येतंय. धीर एकवटत पीडित मुलीने आपल्या आईला याबद्दल माहिती देताच…आईने कोंढवा पोलीस ठाण्यात आपली बहिण आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुणे पोलिसांनीही या प्रकरणात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन मावशी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

एप्रिल महिन्यात लॉकडाउन सुरु असताना पीडित मुलीची आई आपल्या ४ मुलांना बहिणीकडे सोडायची. याचदरम्यान मावशीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मावशी व तिचा प्रियकर इच्छेविरोधात मुलीला अश्लील चित्रफीत दाखवत होते. मुलीने इतके महिने याप्रकरणी वाच्यता केली नाही. परंतू अखेरीस धीर एकवटत तिने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्याचं कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं.

दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची करोना चाचणी केली आहे. दोन्ही आरोपींचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयानेही आरोपींना कोठडीत टाकण्याची परवानगी दिली आहे. परंतू करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जेल प्रशासन आरोपींना दाखल करुन घेत नाहीये. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या या आरोपींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून उपचार झाल्यानंतर पुढील कारवाईबद्दल ठरवलं जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 5:37 pm

Web Title: 16 year old molested by maternal aunt and her boyfriend in pune say police psd 91
Next Stories
1 पुणे जिल्ह्यातील नागरिकांना एसटीचा दिलासा; ४० मार्गांवर सुरु झाली बससेवा, पण…
2 बेळगावात शिवरायांचा पुतळा हटविल्याप्रकरणी पुण्यात शिवसेनेकडून निषेध आंदोलन
3 पिंपरी-चिंचवड : स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, १२ जखमी
Just Now!
X