07 April 2020

News Flash

राज्यातील १७.१ टक्के अपंग विद्यार्थी शाळाबाह्य़

युनेस्कोच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

(संग्रहित छायाचित्र)

शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क असताना राज्यातील ५ ते १९ वयोगटातील १७.१ टक्के अपंग विद्यार्थी आतापर्यंत एकदाही शाळेत गेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

युनेस्कोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. ‘युनेस्कोआणि सेंटर फॉर एज्युकेशन इनोव्हेशन अँड अ‍ॅक्शन रीसर्च’ यांनी या संदर्भात पाहणी करून ‘स्टेट ऑफ द एज्युकेशन २०१९ : चिल्ड्रन विथ डिसअ‍ॅबिलिटीज’ हा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध केला. या अहवालासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्तरावर २७ टक्के अपंग विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात आसाममधील (३६.४ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अहवालानुसार राज्यात ६ लाख ८४ हजार ३२८ अपंग विद्यार्थी आहेत. त्यात ३ लाख ८६ हजार ६४ मुलगे आणि २ लाख ९८ हजार २६४ मुली आहेत. यातील १७.१ टक्के विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नाहीत. त्यापैकी १६.६ टक्के मुलगे आणि १७.८ टक्के मुली आहेत. आधी कधीतरी शाळेत गेलेल्या मुलांचे प्रमाण १२.६ टक्के आहे. त्यात १२.३ टक्के मुलगे आणि १२.९ टक्के मुली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी.. एकीकडे १७.१ टक्के अपंग विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नाहीत, तर दुसरीकडे अपंग विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी गोवा (७३.४ टक्के), दुसऱ्या स्थानी केरळ (७३.२ टक्के) आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. ही तीन राज्ये वगळता जवळपास सर्व राज्यांमध्ये शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २० टक्क्य़ांहून जास्त आहे.

सद्यस्थिती वेगळी असण्याची शक्यता

अहवालात २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत शालाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध, समग्र शिक्षा अभियान अशा उपक्रमांतून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे यू-डायससारख्या प्रणालीतील नोंदीनुसार सद्यस्थिती वेगळी आहे. आता बहुतेक अपंग विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले असल्याचा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 2:34 am

Web Title: 17 1 of students with disabilities out of school in the state abn 97
Next Stories
1 महापुरामुळे निवडणुका पुढे ढकलल्या तर काय बिघडेल?
2 ‘अनुच्छेद ३७०’ रद्द केल्याने जगाला प्रखर संदेश – सहस्रबुद्धे
3 शहर विद्रूपीकरणाचा धडाका
Just Now!
X