11 August 2020

News Flash

विसर्जन मिरवणुकीनिमित्त उद्या शहरातील प्रमुख सतरा रस्ते बंद

नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे

मिरवणूक मार्गावर वाहने लावण्यास मनाई

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (५ सप्टेंबर) होणार आहे. प्रथेप्रमाणे लक्ष्मी रस्ता तसेच टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणूक मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

प्रथेप्रमाणे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंडईतील टिळक पुतळ्यापासून मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास होईल. मिरवणूक सुरळीत चालण्यासाठी तसेच शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मिरवणुकीतील वाहनांसह पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महावितरण या आपत्कालीन सेवावगळता अन्य सर्व वाहनांना विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचा वापर करता येणार नाही. शहरातील प्रमुख सतरा रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे (मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीची सांगता होईपर्यंत)- शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, स्वारगेट), लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक, नाना पेठ ते टिळक चौक, अलका टॉकीज चौक), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), बाजीराव रस्ता (बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज, शनिवारवाडा), कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे कोपरा, शनिपार), गणेश रस्ता (दारुवाला पूल ते जिजामाता चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक), टिळक रस्ता (जेधे चौक ते टिळक चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक), जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक), फग्र्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते फग्र्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक ते नटराज चौक), पुणे-सातारा रस्ता (होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक).

वाहनचालकांना वळण्यासााठी उपलब्ध रस्ते पुढीलप्रमाणे- जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक), शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा), मुदलीयार रस्ता (अपोलो टॉकीज), नेहरू रस्ता (संत कबीर चौक), सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक), सातारा रस्ता (होल्गा चौक), बाजीराव रस्ता (सावरकर पुतळा चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक), फग्र्युसन रस्ता (गोखले स्मारक चौक)

विसर्जन मिरवणुकीनिमित्त बाह्य़वळण मार्ग

विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. वाहनचालकांनी बाह्य़वळण  मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बाह्य़वळण मार्ग पुढीलप्रमाणे- कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक-विधी महाविद्यालय रस्ता-सेनापती बापट रस्ता-गणेशखिंड रस्ता-वेधशाळा चौक-संचेती हॉस्पिटल चौक-अभियांत्रिकी महाविद्यालय-आंबेडकर रस्ता- शाहीर अमरशेख चौक-मालधक्का चौक-बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरू रस्ता-संत कबीर चौक-सेव्हन लव्हज चौक-वखार महामंडळ चौक-शिवनेरी रस्ता-मार्केट यार्ड-सातारा रस्ता-व्होल्गा चौक-मित्रमंडळ चौक-सावरकर चौक-दांडेकर पूल-शास्त्री रस्ता-सेनादत्त पोलीस चौकी-म्हात्रे पूल-नळस्टॉप.

वाहने लावण्याची ठिकाणे

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- एच. व्ही. देसाई महाविद्यालय, शनिवार पेठ, पुलाची वाडी, नदीपात्रातील रस्ता, पूरम चौक ते हॉटेल विश्व, गाडगीळ पुतळा चौक ते कुंभारवेस, दारुवाला पूल ते खडीचे मैदान चौक, काँग्रेस भवन, महापालिका भवन रस्ता, जयवंतराव टिळक पूल ते भिडे पूल, हमालवाडा वाहनतळ, नारायण पेठ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2017 4:01 am

Web Title: 17 main roads close in pune city close due to the immersion procession
Next Stories
1 गुंडांसाठी काठीची मात्रा वापरणारा पोलीस अधिकारी केंद्रीय मंत्रिमंडळात!
2 सप्तश्रृंग गडावर दरड कोसळून पुण्यातील गाडीचे नुकसान
3 १४ वर्षांच्या मुलाचा ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू, पुण्यात ब्लू व्हेलचा पहिला बळी?
Just Now!
X