28 February 2021

News Flash

जिवे मारण्याची धमकी देत पिंपरीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरीत १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

कठुआ, सुरत आणि उन्नाव येथील बलात्काराच्या  घटनांनी देश हादरून गेला आहे. अशात हे प्रकार थांबताना दिसत नाहीत उलट वाढतच आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका २६ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. रवी जाटव असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलगी तिच्या बहिणीकडे राहात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी जाटव हा थेरगाव येथे मजुरीचे काम करतो. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास पीडित मुलीच्या घरी दगड कापण्याची मशीन घेण्याच्या बहाण्याने रवीने प्रवेश केला. त्यावेळी या मुलीची बहिण आणि मेव्हणे बाहेर गेले होते. पीडित मुलगी घरात एकटीच आहे हे पाहून रवीने तिचा हात पकडला आणि तिला खेचत बेडरुममध्ये घेऊन गेला. बेडरुमचा दरवाजा बंद करून रवीने या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीची बहिण आणि मेव्हणे जेव्हा घरी आले तेव्हा पीडितेने त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी रवी जाटवला अटक केली. पोस्को कायदा आणि कलम ३७६ अन्वये रवी जाटव विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.

महिला आणि मुली सुरक्षित नाहीत हेच या प्रकारावरून पुन्हा एकदा समोर आले आहे. जोपर्यंत बलात्काऱ्याला कठोर शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत अशा प्रकारांना आळा बसणे कठीण होत आहे असेच वाढत्या गुन्ह्यांवरून दिसते आहे. या प्रकरणात नराधम रवीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 4:49 pm

Web Title: 17 year old girl raped in pimpri chinchwad
Next Stories
1 राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नवा चेहरा
2 शहरात तापमानाचा पारा वाढणार
3 काश्मीरवासीयांचा विश्वास संपादन करण्यात पंतप्रधान मोदी यांना आलेले अपयश दुर्दैवी
Just Now!
X