News Flash

आजी-आजोबांना भेटण्यासाठी नातवाने चोरली दुचाकी

चिखलीतील १७ वर्षीय मुलाचा प्रताप

 

आजी-आजोबांना भेटणे ही नातवंडांसाठी कायमच खास गोष्ट असते. पण त्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. बारामती येथील आजी-आजोबांकडे जाण्यासाठी नातवाने दुचाकी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन नातवासह दोन साथीदारांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१७ वर्षीय अल्पवयीन आरोपीने बारामती येथील आजी आजोबांकडे जाण्यासाठी नातवाने चक्क दुचाकी चोरली. या घटनेची माहिती मुलाच्या आईला नव्हती, अखेर चिखली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या आईला याबाबत समजले. या १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला बारामती येथे वास्तव्यास असलेल्या आजी-आजोबांकडे जायचे होते. त्यासाठी स्वतःची दुचाकी घेऊन जाण्याचे त्याने ठरवले. आता दुचाकी आणायची कुठून असा प्रश्न असल्याने त्याने दुचाकी चोरायचे ठरवले. त्याप्रमाणे चार दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलाने मित्रांना सोबत घेऊन चिखली परिसरातील दुचाकी चोरली. बारामतीला दुचाकीवर जात असताना दोन मित्रांसह त्याला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले.

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते. नंतर संबंधित मुलाने दहावीत शाळा सोडली आणि घरीच राहायला लागला. या मुलाची आई खाजगी कंपनीत नोकरी करुन मुलाचा सांभाळ करते. दरम्यान याआधी १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीने दोन दुचाकी चोरल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत. त्यासाठी त्याने स्वतःची दुचाकी घेऊन जाण्याचा हट्ट धरला होता. आजी-आजोबांकडे जाण्यासाठी ४ दिवसांपूर्वी या मुलाने आपल्या मित्रांना सोबत घेऊन चिखली परिसरातील दुचाकी चोरली. बारामतीला दुचाकीवर जात असताना दोन मित्रांसह त्याला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 4:41 pm

Web Title: 17 years minor stole 2 wheeler in chikhli pune to meet his grand parents
Next Stories
1 अभिमानास्पद! पुण्यातील १२ वर्षीय मुलाने लावला समुद्रातील प्लास्टिक काढण्याच्या तंत्रज्ञानाचा शोध
2 अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या
3 ‘सीएचबी’ प्राध्यापकांचे मानधन अद्यापही जुन्याच पद्धतीने
Just Now!
X