पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लू झाल्यामुळे १७ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या वर्षातली ही पहिलीच घटना आहे. २०१७ या वर्षात स्वाईन फ्लूमुळे ६१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज चऱ्होली या ठिकाणी राहणाऱ्या १७ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या तरूणावर पिंपरी चिंचवडच्या यशवंत राव स्मृती रूग्णालयात उपचार सुरु होते. २० जानेवारीपासून या तरूणावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. २०१७ या पूर्ण वर्षात पिंपरीत स्वाईन फ्लूची लागण झाल्याने ६१ जणांचा मृत्यू झाला होता.
पिंपरीतील आणखी एका रूग्णाला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खासगी रूग्णालयात या रूग्णावर उपचार सुरू आहेत. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यावर तातडीने डॉक्टरांकडे जावे आणि तपासणी करावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. तर टॅमि फ्लूच्या गोळ्या, प्रतिबंधक लस वेळच्या वेळी घ्यावी असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 8:51 pm