करोना विषाणूचे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत असून आज दिवसभरात १७९ नवे रुग्ण आढळून आले. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुण्यात आज दिवसभरात १७९ नव्याने रुग्ण आढळल्याने शहरातील एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ७८२ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज अखेर एकूण २५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, रुग्णलयांमध्ये उपचार घेत असलेल्या ७७ रुग्णांची आज पुन्हा करोनाची चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले. तसेच आज अखेर २ हजार ५५० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.