News Flash

पुण्यात दिवसभरात १८० नवे करोनाबाधित, पिंपरी-चिंचवडमध्ये १०६ रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवडमध्ये चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात १८० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे आता पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ९२ हजार ९८२ झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. कालपर्यंत पुण्यात ४ हजार ७७४ मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर आज २६५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजअखेर पुण्यात १ लाख ८६ हजार ८०१ जण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १०६ करोनाबाधित रुग्णांची नोंद असून, १६७ जण करोनामुक्त झाले. तर, उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ८३२ वर पोहचली असून यापैकी ९६ हजार ४४ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५८८ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात मागील दोन दिवस करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळली होती. त्यानंतर आता पुन्हा मागील २४ तासांमधील नवीन करोनाबाधितांची संख्या ही याच कालावधीत करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यभरात २ हजार ७६८ नवे करोनाबाधित आढळले, तर १ हजार ७३९ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ४१ हजार ३९८ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३४ हजार ९३४ आहे असून, आजपर्यंत ५१ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 9:27 pm

Web Title: 180 new corona patients in pune in a day 106 patients in pimpri chinchwad msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मराठी व कानडींना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केली – शरद पवार
2 “असे अंदाज व्यक्त करण्यापलीकडे फडणवीसांच्या हातात काही नाही”
3 स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…; आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक
Just Now!
X