पुण्यात आज दिवसभरात नव्याने १८२ रुग्ण आढळले तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४५ रुग्ण आढळल्याने परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनली आहे. तसेच पुण्यात दिवसभरात ९ तर पिंपरी-चिंचवडमध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात दिवसभरात १८२ रुग्ण वाढल्याने एकूण संख्या ७, ४४७ वर पोहोचली आहे. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज अखेर ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणाऱ्या १७० रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज अखेर ४ हजार ६७५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ४५ जण करोनाबाधित रुग्ण आढळले असून दोन जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या ६७८ वर पोहचली आहे. तर आज ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल ४०१ शहरातील तर शहराबाहेरील ५५ रुग्णांना उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहे. शहर आणि शहराबाहेरील असे मिळवून एकूण २८ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.