पुणे शहरात दिवसभरात १८५ तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १७२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच पुण्यात तिघांचा तर पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६९,९७९ वर पोहोचली आहे तर पिंपरी-चिंचवडची एकूण संख्या ९२,३३१ झाली आहे.

पुण्यात दिवसभरात झालेल्या तीन मृत्यूंमुळे एकूण करोनाबाधित मृतांची संख्या ४, ४६४ इतकी झाली आहे. दरम्यान, ३५६ जणांचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आजअखेर १,६०,१४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १७२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १७८ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचारांदरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९२, ३३१ वर पोहचली असून यांपैकी, ८८,३५७ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १,०२९ एवढी आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.