25 October 2020

News Flash

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

खेळताना अचानक तोल गेला.

2 year old child fall down from building : रुद्रचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने मंजाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी सकाळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली. येथील काळेवाडीच्या तापकीर परिसरात दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. येथील बबाई निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रुद्र अमोल मंजाळ हा चिमुकला खेळत होता. यावेळी त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याला उपचारासाठी वाय. सी. एम. येथे दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रुद्रचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने मंजाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुद्र हा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ यांचा नातू होता. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाकड पोलीस सध्या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 4:42 pm

Web Title: 2 year old child fall down from building dies in pune
Next Stories
1 थर्टी फस्टला दारू पिऊन दुचाकी चालवणे जीवावर बेतले; तरुण-तरूणीचा मृत्यू
2 नववर्षांचे जल्लोषी स्वागत!
3 पुढील लोकसभेनंतर भाजप दोन आकडय़ांवर: जिग्नेश मेवाणी
Just Now!
X