पिंपरी-चिंचवड शहरात आज(सोमवार) दिवसभरात ७४८ नवे करोनाबाधित आढळले, तर २० जणांचा मृत्यू झाला. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे ७२७ जणांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या २३ हजार ६८२ वर पोहचली आहे. या पैकी आतापर्यंत १६ हजार २०६ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात ३ हजार ८९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेत्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात ७८१ नवे करोनाबाधित आढळले, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५८ हजार ३०४ झाली आहे. आजअखेर १ हजार ३८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ८२२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर ३९ हजार ९३९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.