दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ जण सहभागी होते, अशी माहिती महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे. या पैकी २२ जणांना शोधण्यात पोलीस आणि आरोग्य विभागाला यश आलं आहे. या सर्वांच्या घशातील द्रव्यांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या एका महिलेवर देखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आलेले ९ जण हे पिंपरी-चिंचवडमध्ये काही कामानिमित्त आलेले आहेत. विशेष म्हणजे ते दिल्लीमधील कार्यक्रमातही सहभागी होते.

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात शेकडोजण विविध राज्यातून आणि परदेशातून सहभागी झाले होते. त्यातील काही जण पिंपरी-चिंचवड शहरातील असून २२ जणांना महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ३२ जणांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील ९ जण असून ते दिल्लीतील कार्यक्रमात होते. त्यांच्यासह एकूण आकडा ३२ आहे. सध्या त्यांच्यावर देखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी व्यक्तीचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस आणि आरोग्य विभाग घेत आहे.