पुणे शहरात आज दिवसभरात नवे ६९७ रुग्ण आढळल्याने, १ लाख ५२ हजार ८९७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ७८६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ९७० रुग्णांची तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ३५ हजार ३७५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ५०९ करोना बाधित रुग्ण आढळले असून १२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर  ४७४ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या ८२ हजार ९९३ वर पोहचली आहे. पैकी ७७ हजार २३७ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ८३५ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.