पुण्यात आज दिवसभरात नव्याने २३४ रुग्ण आढळले तर पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने ६८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे पुण्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या ९,८९० तर पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण रुग्णसंख्या १,२४६वर पोहोचली आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २३६ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६,४४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने ६८ करोना बाधित रुग्ण आढळले असून महानगर पालिकेच्या हद्दीतील एकाचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या १,२४६ वर पोहचली आहे. तर मृतांची एकूण संख्या ४१ वर गेली आहे. आज ६१ जण करोना मुक्त झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ८०० पेक्षा अधिक जण करोनामुक्त झाले आहेत.