News Flash

पुण्यात एकाच दिवसात २४३ रुग्ण, पिंपरीत ११४ नवे रुग्ण

पुण्यात सहा तर पिंपरीत नऊ रुग्णांचा मृत्यू

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात २४३ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७४ हजार ४५२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५४९ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३४६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६४ हजार ९५३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ११४ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १०६ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९४  हजार ६३९ वर पोहचली असून पैकी, ९१ हजार ३८२ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७६० एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 8:32 pm

Web Title: 243 new corona cases in pune and 114 new cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा
2 दिल्लीच्या आंदोलनाची केंद्रानं दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातून…; अजित नवलेंचा इशारा
3 अमानुष कृत्य : सात महिन्याच्या श्वानाला चौथ्या मजल्यावरून फेकले; घटनेत श्वानाचा मृत्यू
Just Now!
X