01 December 2020

News Flash

पुण्यात करोनाचे २४७ नवे रुग्ण, पिंपरीत १३९ रुग्ण

पुण्यात १६ तर पिंपरीत सहा जणांचा मागील २४ तासांमध्ये करोनामुळे मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २४७ रुग्ण आढळल्याने, १ लाख ६२ हजार ९१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार २७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २८० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५२ हजार १६९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १३९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १३५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८८ हजार १२९ वर पोहचली असून पैकी ८४ हजार ८४५ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८७६ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 10:03 pm

Web Title: 247 new corona cases in pune and 139 new cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 मनसेत प्रवेशाबद्दल माजी आमदार मेधा कुलकर्णींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाल्या…
2 वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी काढली धिंड
3 पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात परराज्यातून चोरून आणलेल्या मोटारी विकणारी टोळी गजाआड
Just Now!
X