News Flash

शाळाबाह््य मुलांमध्ये २८८ बालकामगार

राज्यातील शोधमोहिमेतून वास्तव उघड

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात शाळाबाह््य म्हणून आढळलेल्या मुलांपैकी २८८ मुले बालकामगार असल्याचे वास्तव शाळाबाह््य मुलांच्या शोधमोहिमेतून उघड झाले आहे. नाशिक, पालघर, मुंबई, वर्धा, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह््यांमध्ये बालकामगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळाबाह््य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्यव्यापी शोधमोहीम १ ते १० मार्च या कालावधीत राबवली. त्यातून २५ हजार २०४ विद्यार्थी शाळाबाह््य असल्याचे संकलित के लेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. शोध मोहिमेचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. शाळाबाह््य मुलांमध्ये २८८ बालकामगार, १ हजार २१२ विशेष गरजा असलेली मुले आहेत. तर २३ हजार ७०४ मुले अन्य कारणांमुळे शाळाबाह््य झाली असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

* बालकामगार मुलांपैकी सर्वाधिक ८५ मुले नाशिक जिल्ह््यात, त्या खालोखाल पुणे जिल्ह््यात ५८, पालघर ३८, नंदूरबार ३०, नांदेड जिल्ह््यात १७, वर्धा जिल्ह््यात १२, यवतमाळ जिल्ह््यात १३ बालकामगार असल्याचे अहवालातून दिसून येत आहे.

* परराज्यातून स्थलांतरित होऊन आलेल्या मुलांमध्ये ४ हजार १७२ मुले, ३ हजार ६१२ मुली आहेत. राज्याबाहेर स्थलांतरित होऊन गेलेल्यांमध्ये ७ ३६५ मुले, ६ ७१९ मुली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:29 am

Web Title: 288 child laborers among out of school children abn 97
Next Stories
1 बारावीचे विद्यार्थी तणावग्रस्त, परीक्षेच्या अनिश्चिततेचा परिणाम
2 आता मेट्रोच्या कामांनाही वेग
3 देवगड हापूसच्या नावाखाली ग्राहकांना कर्नाटक आंब्यांची विक्री        
Just Now!
X